ज्ञानदीप फौंडेशन - कार्य

ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन - कार्य

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून समाज प्रबोधन करण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने खालील संकेत स्थळे निर्माण केली आहेत.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. सांगली या वेबसाईट व सॉफ्टवेअर विकसित करणार्‍या संस्थेने फौंडेशनच्या कामास सहकार्य म्हणून या संकेत स्थळांच्या निर्मितीत बहुमोल सहकार्य केले आहे.

फौंडेशनने आतापर्यंत मराठीतून विज्ञानप्रसारासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरण व बांधकाम क्षेत्रासाठी खालील परिसंवाद घेतले आहेत.

१. यूज ऑफ सोलर एनर्जी इन बिल्डींग (सूर्यशक्तीचा घरबांधणी क्षेत्रात वापर) के. आय. टी., कोल्हापूर
२. ग्रीन बिल्डींग डिझाईन (हरित गृहरचना) हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर
३. ड्रीम ऑफ ग्रीन सिटी (स्वप्न हरित नगरीचे) हॉटेल सिनेटर, कोथरूड, पुणे
४. ग्रीन बिल्डींग डिझाईन, इंजिनीअर्स ऍंड आर्किटेक्ट्स असोसिएशन, नाशिक
याशिवाय हुपरी, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर, सांगली येथे स्थानिक संस्थांच्या परिसंवादात सहभाग घेतला आहे.

ज्ञानदीप एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे संस्थेच्या विश्वस्त सौ. शुभांगी सु. रानडे यांच्या खालील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
१. काव्यदीप कवितासंग्रह
२. ’सांगावा’ कवितासंग्रह
३. ’संस्कृतदीपिका’ मराठी- संस्कृत शब्दकोश
मराठीतून संस्कृत व्याकरण शिक्षणासाठी ’संस्कृतदीपिक” या माहिती व ध्वनीआधारित सी. डी. च्या निर्मितीचे काम चालू असून लवकरच ती विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

ज्ञानदीप एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फौंडेशन अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांशी शिक्षण, संशोधन तसेच समाज प्रबोधनासाठी सहकार्य करीत आहे. सध्या मराठीतून व काही विशिष्ट विषयात कार्य सुरू असले तरी सर्व भारतीय भाषांमध्ये हे कार्य वाढविण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

संस्थेच्या या कार्यात आपण सक्रीय सहभाग घ्यावा तसेच सढळ हाताने आर्थिक मदत करावी ही विनंती. आपणा सर्वांच्या सहकार्याने ही संस्था माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्व भारतीयांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात यशस्वी होईल अशी खात्री वाटते.

 

 

Hits: 60