निसर्गाची नवलाई
निसर्ग म्हणजे एक अत्यंत निष्णात असा कलाकार आहे. अनेक नयनरम्य स्थळे निसर्गाने निर्माण केली आहेत. आश्र्चर्याने थक्क करून सोडणारे विविध नैसर्गिक अविष्कार निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या द्रुष्यांनी मनाला आनंद आणि समाधान मिळत असल्याने अशा स्थळी जाण्याची सर्वांची इच्छा असते. परंतु ते नेहेमीच जमते असे नाही. तेव्हा त्यांची छायाचित्रे पाहावीत आणि रसभरीत वर्णनं वाचावीत, असे देखील नक्कीच वाटते. इंग्रजी भाषेतील अनेक ग्रंथ ही इच्छा पूर्ण करतात, हे निश्र्चित . परंतु ते ग्रंथ सर्वत्र उपलब्ध नसतात शिवाय त्यांच्या किमती देखील बऱ्याच जास्त असल्याने सर्वसामान्य मराठी वाचकाला ते ग्रंथ मिळू शकत नाहीत. असल्या अडचणी लक्षात घेऊन काही मराठी लेखकांनी नैसर्गिक अविष्कार आणि सौदर्याचे वर्णन करणारी पुस्तके लिहिली आहेत. परंतु त्यांची संख्या अल्प आहे. ही बाब विचारात घेऊन प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई हे लहानसे पुस्तक लिहून आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने ते उत्तम रीत्या प्रकाशित करून जिज्ञासू मराठी वाचकांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास हातभार लावला आहे. यासाठी प्रा. सहस्त्रबुद्धे आणि नचिकेत प्रकाशन यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
एकूण 25 लेखांच्या या पुस्तकात ङ्कबॅड लॅन्डस्ङ्ख, ङ्कप्रचंड खिंडङ्ख,ङ्कग्रेट सॉल्ट लेकङ्ख, ङ्कमृत दरीङ्ख, ङ्कमृत समुद्रङ्ख, ङ्कनैसर्गिक गरम पाण्याचा झराङ्ख, इत्यादी नऊ लेखांमधून विविध ठिकाणांचे वर्णन केले आहे. ङ्कपाऊस कसा येतोङ्ख, ङ्कहिमनग वा हिमगिरीङ्ख ङ्कतुफानी वादळङ्ख अशा लेखातून नैसर्गिक अविष्कार कसे घडतात, याचे स्पष्टीकरण अतिशय सोप्या पद्धतीने केले आहे. सर्व लेखांची सुरूवात अत्यंत आकर्षक तऱ्हेने केली असल्याने संपूर्ण लेख वाचण्याची सहजच इच्छा होते, आणि लेखाचे पूर्ण वाचन झाल्यावर एखादी नवीन माहिती कशी सहजपणे मिळाल्याने आनंद होतो. पुस्तकाचे रंगीत मुखपृष्ठ आतील माहितीला अनुरूप असून फारच आकर्षक असे आहे. पुस्तकाचा कागदही उत्तम दर्जाचा वापरला असून अक्षरांचा आकार (ऋेपीं डळसश) योग्य असल्याने मजकूर वाचायला अजिबात त्रास होत नाही. अंतरंग व बाह्यरंग दोन्ही दृष्टीने पुस्तक उत्तम झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे पुस्तक फारच उपयुक्त वाटेल, अशी आशा वाटते.
लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे
डॉ. मधुकर आपटे ,नागपूर
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट,
स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15