शास्त्रीय कारणे द्या. (६१ - ८०)

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

६१ भक्कम विमानाला नाजुक पक्षांमुळेही धोका होऊ शकतो.
६२ डोंगर दरीत प्रतिध्वनी ऐकू येतो.
६३ हाताला तेल लावले की दाण्यांची साले चटकन निघतात.
६४ हगवणीवर मीठ साखर घातलेले पाणी बहुगुणी ठरते.
६५ बर्फाच्छादित प्रसेशातही बर्फाखालच्या पाण्यात मासे जिवंत राहू शकतात.
६६ माठात पाणी थंड होते.
६७ थर्मासमध्ये पदार्थ तापमान टिकून राहते.
६८ फ्रीजमध्ये पदार्थ जास्त काळ चांगले राहतात.
६९ प्लॅस्टक पिशव्या पर्यावरणास हानीकारक ठरतात.
७० रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खते जास्त प्रमाणास वापरावीत.
७१ बांबूच्या बेटात शीळ ऐकू येते.
७२ तंबोऱ्याच्या तारा ताणल्याकी चांगला आवाज येतो.
७३ पोटदुखीवर खाण्याचा सोडा उपयुक्त ठरतो.
७४ लांबून जहाज जवळ येत असताना त्याचे प्रथम शीड दिसते नंतर जहाज दिसते.
७५ पूर्वीच्या घड्याळात लंबक वापरला जाई.
७६ स्लॅबच्या काँक्रीटमध्ये खालच्या भागात लोखंडाच्या सळया घालतात.
७७ एक डोळा मिटला तर सुईत दोरा ओवणे अवघड जाते.
७८ चित्र काढताना कागदावर आधी साध्या पाण्याचा हात देतात.
७९ पाणी लावले की पोस्टाचे तिकीट चटकन निघते.
८० पंख्याची पाती जरा वाकवलेली असतात.

Hits: 36