अल्बर्ट अब्राहाम मायकेलसन

अल्बर्ट अब्राहाम मायकेलसन :(जन्म : १९-१२-१८५२, मृत्यू : ०९-०५-१९३१)
अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ. जन्म प्रशियातील जर्मनी व पोलंड यांच्या सरहद्दीवरच्या स्ट्न्ेल्नो या गावी झाला. २ वर्षे वयाचा असतानाच त्याचे आईवडील यांनी अल्बर्टसह अमेरिकेला प्रयाण केले. विल्यम मोर्ले याच्या सहकार्याने प्रकाशासंबंधी अनेक काटेकोर प्रयोग करून ईथर या प्रकाशलहरीसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या माध्यमाचा फोलपणा नजरेला आणून दिला. प्रकाशाच्या वेगाचे काटेकोर मोजमाप केले. त्याच्या प्रकाशीय संशोधन कार्यासाठी त्याला १९०७ चे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

Hits: 76