सर आयझॅक न्यूटन

           सर आयझॅक न्यूटन

(जन्म : २५-१२-१६४२, मृत्यू : २०-०३-१७२७)
ब्रिटिश गणिती, ज्योतिर्विद व भौतिक शास्त्रज्ञ. जन्म लिंकन शायर परगण्यातील बुल्झथॉर्प या छोट्या खेड्यात झाला. गुरूत्वाकर्षणाच्या सिध्दांतामुळे न्यूटनचे नांव आता शाळकरी मुलांपासून सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. न्यूटनने विज्ञानाच्या तीन क्षेत्रात विशेष कामगिरी केली. ही क्षेत्रे म्हणजे गणित. दुसरे-गतिशास्त्र आणि तिसरे-प्रकाशशास्त्र. न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आजच्या अवकाशयुगात पृथ्वीवरून अंतराळात झेपावणाऱ्या अग्निबाणाच्या उड्डाणात पायाभूत महत्त्वाचे आहेत. प्रकाशाचे पृथ:क्करण काचेच्या लोलकाचे साहाय्याने करून पांढरा प्रकाश मुळात अनेक वर्णांचे मिश्रण असतो. हे न्यूटनने दाखवले. अंतर्गोल आरसा वापरून पहिली परावर्ती दुर्बिणही न्यूटननेच केली.

Hits: 93