जोसेफ जॉन थॉमसन

(जन्म : १८-१२-१८५६, मृत्यू : ३०-०८-१९४०)
ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ. जन्म मँचेस्टरनजीकच्या `चीथॅम हिल' या गावी झाला. एकोणिसाव्या शतकात डाल्टनच्या अणु-सिध्दांतामुळे `वस्तूचा-मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु' असे प्रस्थापित झाले होते. या अणूच्याही अंतरंगात असणाऱ्या कणांचे, इलेक्ट्नॅनचे अस्तित्व थॉमसनने दाखवून दिले. त्यामुळे अणु-कल्पनेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक झाले. थॉमसनला त्याच्या शोधाबद्दल १९०६ सालचे भौतिक विभागाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

Hits: 67