सतिश धवन

                    सतिश धवन

(जन्म : सप्टेंबर २५, १९२० मृत्यू : जानेवारी ३, २००२)
सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केन्द्र असे नामकरण करण्यात आले.

Hits: 89