शास्त्रज्ञ

१) जोसेफ लुई गेल्युझॅक : (जन्म : ०६-१२-१७७८, मृत्यू : ०९-०५-१८५०)
जोसेफ लुई गेल्युझॅकचा जन्म फ्रान्समध्ये सेंट लिओनार्ड येथे झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर प्रख्यात फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ बर्थोलेट याच्या साहाय्यकाचे काम केले. १८०४ मध्ये बलूनच्या सहाय्याने हवेत ४००० मीटर उंचीवर जाऊन तेथील वायूंचे नमुने घेऊन परीक्षण केले. प्रख्यात जर्मन रसायन-शास्त्रज्ञ अॅलेक्झांडर फोन हंम्बोल्ट याचा सहकारी संशोधक म्हणून काम केले. वायूचे तापमान, दाब आणि आकारमान यांचा परस्परसंबंध निश्चित करण्यासाठी अत्यंत काटेकोर बिनचूक मापने केली आणि आता `गे ल्युसॅक' चे नियम म्हणून प्रसिध्द झालेले नियम सिध्द केले.

२) कार्ल विल्हेम्स शीले : (जन्म : ०९-१२-१७४२, मृत्यू : २१-०५-१७८६)
स्वीडनमध्ये पीमेरेनिया प्रांतातील स्ट्नल्सुंड गावी जन्म. बालपण गरीबीत व हालअपेष्टात गेले. लहानपणापासून रसायन शास्त्राची आवड. टार्टरिक आम्ल, चांदीच्या संयुगांवर प्रकाशाचा परिणाम, मँगेनीजची संयुगे, पारा, लोह, तांबे यांचे ऑक्सिडीकरण याविषयी अनेक प्रयोग करून नवे निष्कर्ष प्रकाशित केले. ऑक्सिजन वायूचा शोध शीलेने जोसेफ प्रीस्टलेच्या शोधाचे अगोदर दोन वर्षे म्हणजे १७७२ मध्येच लावला होता, पण या शोधाला वेळीच प्रसिध्दी न दिल्याने त्याचे हे श्रेय हुकले. क्लोरीन, ग्लिसरीन, प्रुसिक आम्ल यांचा शोध त्याने लावला. सतत घातक रसायनाच्या सान्निध्यात प्रयोग करीत राहिल्यामुळे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी त्याला मृत्यू आला.

३) सर हम्फ्रे डेव्ही : (जन्म : १७-१२-१७७८, मृत्यू : २९-०५-१८२९)
ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. जन्म कार्नवाल परगण्यात पेंझॅन्स येथे झाला. लहानपणापासून रसायनशास्त्राची आवड. निरनिराळया वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामासंबंधी प्रयोग. त्यातून नायट्न्स ऑक्साईड वायू वेदनाहारक असल्याचा शोध. वीज प्रवाहाने अनेक रासायनिक संयुगाचे पृथ:क्करण केले आणि सोडियम, पोटॅशियम नि मॅग्नेशियम हे धातू तयार केले. कोळशाच्या खाणीतील ज्वालाग्राही वायू यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी `डेव्ही संरक्षक दीप' तयार केला. ४) जोसेफ हेन्री : (जन्म : १७-१२-१७९७, मृत्यू : १८७८)
अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क प्रांतातील अल्बनी शहरानजीकच्या खेड्यामध्ये झाला. बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. १३ व्या वर्षापर्यंत जेमतेम लिहिता-वाचता येण्यापुरतेच शिक्षण झाले होते, पण नंतर वाचनाची विलक्षण आवड निर्माण होऊन त्यातूनच विज्ञानाची गोडी निर्माण झाली. सतराव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण करून शिक्षकाची नोकरी सुरू केली. स्वत: अनेक प्रयोग करून विद्युत-चुंबकीय प्रवर्तनासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. पहिले विद्युत चुंबकीय तत्त्वावर चालणारे तारायंत्र तयार केले, अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटचा पहिला कार्यवाह. याच्या स्मरणार्थ विद्युत-चुंबकीय प्रवर्तनाच्या एककाला (युनिट) `हेन्री' हे नांव दिले आहे.

५) जोसेफ जॉन थॉमसन : (जन्म : १८-१२-१८५६, मृत्यू : ३०-०८-१९४०)
ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ. जन्म मँचेस्टरनजीकच्या `चीथॅम हिल' या गावी झाला. एकोणिसाव्या शतकात डाल्टनच्या अणु-सिध्दांतामुळे `वस्तूचा-मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु' असे प्रस्थापित झाले होते. या अणूच्याही अंतरंगात असणाऱ्या कणांचे, इलेक्ट्नॅनचे अस्तित्व थॉमसनने दाखवून दिले. त्यामुळे अणु-कल्पनेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक झाले. थॉमसनला त्याच्या शोधाबद्दल १९०६ सालचे भौतिक विभागाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

६) अल्बर्ट अब्राहाम मायकेलसन : (जन्म : १९-१२-१८५२, मृत्यू : ०९-०५-१९३१)
अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ. जन्म प्रशियातील जर्मनी व पोलंड यांच्या सरहद्दीवरच्या स्ट्न्ेल्नो या गावी झाला. २ वर्षे वयाचा असतानाच त्याचे आईवडील यांनी अल्बर्टसह अमेरिकेला प्रयाण केले. विल्यम मोर्ले याच्या सहकार्याने प्रकाशासंबंधी अनेक काटेकोर प्रयोग करून ईथर या प्रकाशलहरीसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या माध्यमाचा फोलपणा नजरेला आणून दिला. प्रकाशाच्या वेगाचे काटेकोर मोजमाप केले. त्याच्या प्रकाशीय संशोधन कार्यासाठी त्याला १९०७ चे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

७) श्रीनिवास रामानुजन् : (जन्म : २२-१२-१८८७, मृत्यू : २६-०४-१९२०)
भारतीय गणिती. कुंभकोणम् येथे शालेय शिक्षण. तेथेच सरकारी महाविद्यालयात इंटर सायन्स उत्तीर्ण. त्यानंतर १९१४ पासून केम्ब्रिज विद्यापिठात दाखल. १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचा सभासद म्हणून निवड. केम्ब्रिज विद्यापीठाचा ि्निनटाटी फेलो. रामानुजन् हा गणिती शास्त्रातला एक चमत्कार मानला जातो. अंक-शास्त्रात त्याने बसवलेले नियम नि आडाखे त्या शास्त्रातील अतिरती-महारथींनाही थक्क करून सोडणारे होते. सुमारे ८०० पृष्ठे भरतील एवढ्या त्याच्या लिखाणात त्याने चार हजाराहून अधिक प्रमेयांचा उहापोह केला आहे. इंग्लंडची हवा न मानवल्याने वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी हा महान गणिती मृत्यू पावला.

८) जेम्स प्रेंस्कॉट ज्यूल : (जन्म : २४-१२-१८१८, मृत्यू : ११-१०-१८८९)
ब्रिटीश भौतिक शास्त्रज्ञ. जन्म मँचेस्टरनजीक सालफोर्ड या गावी. विविध प्रकारच्या कार्यशक्तींचे - उदा. प्रकाश, उष्णता, रासायनिक, गतिज, विद्युत् इत्यादींचे एकमेकांत रूपांतर होऊ शकते आणि संपूर्ण विश्वातील सर्व शक्तींची मिळून एकूण गोळाबेरीज कायम राहते, तिच्यात घट किंवा वाढ होत नाही, असा शक्तीच्या अविनाशित्वाचा क्रांतिकारक सिध्दांत ज्यूलने मांडले. पुढे आईन्स्टाईनच्या ए = चल२ या सिध्दांतानुसार वस्तूचे रूपांतर ऊर्जेत होते हे सिध्द झाल्यानंतर `वस्तु-शक्ती' या दोहोंचे मिळून अविनाशत्व' असे म्हणणे आवश्यक झाले. ज्यूल याच्या स्मरणारर्थ ऊर्जेच्या एककाला `ज्यूल' हे नांव देण्यात आले आहे.

९) सर आयझॅक न्यूटन : (जन्म : २५-१२-१६४२, मृत्यू : २०-०३-१७२७)
ब्रिटिश गणिती, ज्योतिर्विद व भौतिक शास्त्रज्ञ. जन्म लिंकन शायर परगण्यातील बुल्झथॉर्प या छोट्या खेड्यात झाला. गुरूत्वाकर्षणाच्या सिध्दांतामुळे न्यूटनचे नांव आता शाळकरी मुलांपासून सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. न्यूटनने विज्ञानाच्या तीन क्षेत्रात विशेष कामगिरी केली. ही क्षेत्रे म्हणजे गणित. दुसरे-गतिशास्त्र आणि तिसरे-प्रकाशशास्त्र. न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आजच्या अवकाशयुगात पृथ्वीवरून अंतराळात झेपावणाऱ्या अग्निबाणाच्या उड्डाणात पायाभूत महत्त्वाचे आहेत. प्रकाशाचे पृथ:क्करण काचेच्या लोलकाचे साहाय्याने करून पांढरा प्रकाश मुळात अनेक वर्णांचे मिश्रण असतो. हे न्यूटनने दाखवले. अंतर्गोल आरसा वापरून पहिली परावर्ती दुर्बिणही न्यूटननेच केली.

१०) लुई पाश्चर : (जन्म : २७-१२-१८२२, मृत्यू : २८-०९-१८९५)
फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. जन्म फ्रान्समध्ये डोल नावाच्या गांवी. दूध आंबणे, फळांच्या रसाची, द्राक्षरसाची आंबवून दारू होणे यासारख्या रासायनिक प्रक्रिया मूलत: काही सूक्ष्म जांतूंच्या (बॅक्टेरिया) क्रियाशक्तीनेच घडून येतात हा महत्त्वाचा शोध लावला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या `रेबीज' या प्राणघातक रोगावर परिणामकारक लस शोधून काढली. सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया याने घातला.

११) जोहान केप्लर : (जन्म : २७-१२-१५७१, मृत्यू : १५-११-१६३०)
जर्मन ज्योतिर्विद. कोपर्निकस याने मांडलेल्या सूर्यकेन्द्री विश्व-कल्पनेचा (सर्व ग्रह आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरतात) पाठपुरावा केला आणि सूर्याभोवती ग्रहांचे व उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवले. यासंबंधी केप्लरचे तीन नियम प्रसिध्द आहेत, ते असे : (१) प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा विवृत्तीय, लंबगोलाकार असते. या लंबगोलाच्या दोन केन्द्रांपैकी एका केन्द्राशी सूर्य असतो. (२) ग्रह आणि सूर्य एका काल्पनिक रेषेने जोडले तर ग्रहाच्या मार्गक्रमणात ही रेषा ठराविक काळात ठराविक क्षेत्रफळ आक्रमते. याचाच अर्थ जेव्हा ग्रह सूर्याचे जवळ असतो त्यावेळी तो अधिक वेगाने मार्गक्रमण करतो. (३) ग्रह आणि सूर्य यांच्यातील सरासरी (मध्यम) अंतराचा घन हा त्या ग्रहाच्या सूर्याभोवतीचे एका प्रदक्षिणा कालाच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. याचा अर्थ ग्रह जितका सूर्यास जवळ तितका त्याचा प्रदक्षिणा काल (वर्ष) लहान असतो.

Hits: 75