ब्रह्मगुप्त (५९८-६६०)
हा एक महाप्रतिभावान् गणिती होऊन गेला. त्यानें लिहिलेल्या ``ब्रह्मस्फुटसिध्दान्त'' या ग्रंथांत गणिताव्याय व कुटकाध्याय असें दोन भाग आहेत. या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन गणितावरील प्रमाणभूत ग्रंथ मानला जात असे. ग्रंथात शून्यलेखनाचा आणि संख्यालेखनाचा सर्वत्र उपयोग केलेला आहे. ब्रह्मगुप्ताची बीजगणितांतील नेत्रदीपक कामगिरी म्हणजे केबल ऋणात्मक संख्यांची कल्पना, वर्गसमीकरणाची मीमांसा, उपपत्ति आणि सिध्दता ही होय. काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म, चक्रीय चौकोनाचे गुणधर्म, वर्तुळाचे गुणधर्म, शंकु, प्रसूचि अशा नियमित सांद्रपदार्थांचे घनफळ, शंकु, प्रसूचि अशा नियमित सांद्रपदार्थांचे घनफळ काढलेलें आढळते.
Hits: 77