भारतीय विज्ञान परंपरा भाग - 3

गणित, ज्योतिर्विज्ञान आणि फलज्योतिष : भारतीय ज्योतिर्विज्ञानाची पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतात :

(१) पृथ्वीवरून कुठलाहि ग्रह हा त्या ग्रहाची गति व सूर्यगति यांच्या बेरजेच्या गतीनें फिरतोसा दिसतो. ग्रहाची गति दीर्घवर्तुळाकार तशी सूर्याची गतिहि दीर्घवर्तुळाकार आहे. ग्रहांच्या कक्षामध्यापासून पृथ्वी ढळलेली आहे अशी कल्पना केल्यामुळें साधारण ग्रहगति मिळते. ग्रीक लोकांच्या ज्योतिर्विज्ञानांत दीर्घवर्तुळाकार कल्पना नाही. त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळात्मक पण त्यांत विकेंद्रपणा धरल्यामुळे थोडी चूक दुरूस्त झाली. विश्वरचनेंतील वर्तुळात्मक गतीच्या कल्पनेला धक्का देण्याचे श्रेय भारतीयांना मिळतें.

(२) पूर्ण वर्तुळाचे ३६० भाग पाडले असतां एक भाग म्हणजे एक अंश होतो, हे खाल्डियन माप भारतीयांनी स्वीकारलें नाहीं. त्यांनी कला हें ६१/२ अंश नांवाचें स्वतंत्र एकक मानलें. तसेच भुजज्या हें रेडियन सारखे कोन मोजण्याचे नवीन एकक वापरलें त्यामुळें त्रिकोणामिति बरीच प्रौढावस्थेला गेली होती.

(३) जमिनीला काटकोन करून उभ्या केलेल्या खांबावरून सूर्याची क्रांति व स्थलाचे अक्षांश काढण्यांत भारतीयांचा हातखंडा होता. अक्षांश मोजण्याच्या विविध पध्दति होत्या. चर, अग्रा, भुज, तमशंकु. उन्मंडलशंकु, कोनशंकु, दिनार्धशंकु वगैरे साधनें असत.

(४) ज्योतिर्विज्ञान आणि फलज्योतिष यांची सांगड घालून फलज्योतिषाला शास्त्रीय स्वरूप देण्याचा यशस्वी प्रयत्न वरामिहरानें केला. प्राचीन भारतीय ग्रंथात ज्यातिषायर पाराशराचे वेदांगज्योतिष व गर्ग ऋषीचे गार्गसंहिता हे दोनच ग्रंथ उपलब्ध होते. यराद्दमिहिरानें पौलिसा व रोमका या दोन ग्रीक फलज्योतिषावरील ग्रंथांचा अभ्यास करून भारतीय फलज्योतिष व ग्रीक फलज्योतिष यांचा समन्वय साधणरा वृहत् संहिता हा ग्रंथ तयार केला. त्यांत राशिकल्पना, कुंडलीतील ग्रहस्थानावरून व्यक्तींचे भविष्य वर्तविण्याची पध्दति या दोन गोष्टी ग्रीकांकडून घेतल्या व हें त्यांचे ऋण त्याने प्रांजलपणें मान्य केलें आहे व त्याकरितां --

म्लेच्छादियवना: तेपु सभ्यक् शास्त्रं इदं स्थितम् ।
ऋषिवत् तेऽपि पूज्या:स्थु: किं पुनर्देवविव्दिजा : ।।

दुराराव्य दुरभिमानाच्या आहारीं न जातां, स्वाभिमानांत गुरफटून न बसतां परकीयांचे जें चांगले आहे तें आत्मसात करणें श्रेयस्कर आहे असें गर्गमहर्षांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे मी केले असे वगहमिद्दिर स्पष्ट सांगतो. अशा तऱ्हेने नष्ट पावलेल्या ग्रीकोन्द्रय संस्कृतीतील फलज्योतिषावर सुयोग्य संस्कार करून तें जतन करून ठेवण्याचें श्रेय भारतीयांना मिळतें.

त्या काळांत पाश्चिमात्यांना फलज्योतिषही जीवनांतील एक आवश्यक बाब वाटें. नौकानयन हा जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने चुकलेल्या ज्ञानाचा तेथें काही उपयोग नव्हता. त्यामुळें फलज्योतिषावर त्यांच्याकडून शास्त्रशुध्द अभ्यास झाला, भारतांत तशी विशेष परिस्थिती नव्हती. यात्रा, उत्सव, विवाह याकरितां ज्योतिष लागें, पण त्याचीहि पुढें पुढें व्हावी तशी जोपासना झाली नाहीं. विषय समजण्यास कठीण, आकडेमोड अतिशय त्यामुळे या शास्त्राची आबाळ झाली, आणि कुडमुडे ज्योतिषी निर्माण झाले.

Hits: 54